पेठ -आदिवासी शेतक-यांच्या शेतमाल विक्र ी करण्यासाठी हक्काची एकाधिकार धान्य खरेदी योजना शासनाने जवळपास बासनात गुंडाळल्यात जमा असल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शासकिय धान्य खरेदी योजनाच ठप्प झाल्याने खाजगी व्यापाºयांचे फावले असून आठवडे बाजारात कवडीमोल भावात धान्याची विक्र ी करण्याची नामुष्की ओढवली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक -२ उप-प्रादेशिक कार्यालय पेठ अंतर्गत तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित पेठ ,करंजाळी ,कोहोर ,आड बु॥ ,जोगमोडी ,बाडगी येथे एकाधिकार पद्धतीने धान्य खरेदी केले जाते . शासनाने धान्य खरेदी दर पत्रक नोहेंबर अखेरीस जाहीर केलेले नसल्याने संपूर्ण पेठ तालुक्यात एकाधिकार पद्धतीने धान्य खरेदी केंद्रे बंद असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी प्रशासनाने तत्परतेने एकाधिकार पद्धतीने धान्य खरेदी करावे अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे. एकीकडे एन वेळी पावसाने दडी मारल्याने भात ,नागली,उडीद,भूईमुंग,वरई ,खुरासणी इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले असून धान्य पिकात मोठी घट निर्माण झाली आहे .आता मात्र शेतकर्याने भात कापणी करून धान्य विक्र ीसाठी एकाधिकार धान्य खरेदी केंद्रे कधी सुरु होते याकडे टक लाऊन बसले आहेत.
पेठ तालुक्यात एकाधिकार धान्य खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 2:19 PM