पाटोदा : पिके ऐन काढणीला आली असतांनाच परिसरात सुरु असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात कधी मध्यम ते कधी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती पिकांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे.या वर्षी परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने पिके जोमात असतानांच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातल्याने परीसरातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतात उभी असलेली सर्व पिके सडून गेली आहे. शेतात कापणी केलेली बाजरीची कणसे व चारा सडून गेल्याने चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच मका बिट्यांना कोंब फुटले आहे. सोयाबीनचीही तीच गत झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेती संकटात सापडली आहे. ज्या कांदा पिकाच्या भरोशावर शेतकरी संपूर्ण आर्थिक गणित मांडत असतो, शेतातील कांदा तसेच कांदा रोपेही सडल्याने शेतकरी वर्गावर संकटाचे आभाळ कोसळले आहे. पावसाने या भागातील द्राक्ष बागाही धोक्यात आल्या आहे. शासनाने सर्वच पिकांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.पाटोदा, ठाणगाव, कानडी, पिंपरी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. दहा बारा दिवसांपूर्वी पावसाने एक दोन दिवस विश्रांती घेतल्याने शेतात असलेली बाजरीची कापणी करून चारा व कणसे गोळा करून ठेवली मात्र त्यानंतर पावसाने दररोज हजेरी लावल्याने कणसे पूर्णपणे पाण्यात भिजली आहे. केलेला हजारो रु पयांचा खर्च वाया गेला आहे. तसेच चाराही सडून गेल्याने जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर होणार आहे. तसेच मका शेतात आडवी पडली असून त्यात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे.
शेतकऱ्यांवर दु:खाचे आभाळ कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:41 PM
पाटोदा : पिके ऐन काढणीला आली असतांनाच परिसरात सुरु असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात कधी मध्यम ते कधी जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती पिकांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देपाटोदा : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी