शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

संगमेश्वरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 5:07 PM

संगमेश्वर : सकल मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा बंदच्या आवाहनास संगमेश्वरात १०० टक्के पाठिंबा मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.

ठळक मुद्देरिक्शा, बस तसेच खासगी प्रवासी वाहनांअभावी हाल झाले.

संगमेश्वर : सकल मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचा बंदच्या आवाहनास संगमेश्वरात १०० टक्के पाठिंबा मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.आज सकाळपासूनच महात्मा फुले रोडवर शुकशुकाट होता. रिक्शा, शैक्षणिक संस्था तसेच छोटी-मोठी व्यापारी दुकाने आज संपूर्णपणे व उत्स्फूर्तपणे बंद ठेवून पाठिंबा दिला. दवाखाने व औषधी दुकाने ह्या अत्यावश्यक सेवा मात्र चालू होत्या. संगमेश्वरातील म. फुले रस्ता, सांडवा पुल, मोसमपूल, रामसेतू पुल ह्या अत्यंत वर्दळीच्या भागात शुकशुकाट होता. रिक्शाची ये-जा बंद होती. हॉटेल, टपऱ्या, पानदुकाने संपूर्णपणे बंद होती. पोलिसांच्या गस्त चालू होता. कुठलीही अनुचित घटना न घडता बंद शांततेत पार पडली. ठिकठिकाणी पोलिसांनी संरक्षक जाळ्या लावून रस्ता अडविला होता. नागरिक व तरुण गटागटाने चर्चा करताना दिसत होते. सर्वांनीच उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांचे मात्र रिक्शा, बस तसेच खासगी प्रवासी वाहनांअभावी हाल झाले. त्यांना पायी चालत जावे लागले. वाहनाअभावी सर्वच रस्ते मोकळे झाले.