विंचूर : जम्मु काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील तीनपाटीवर नागरिकांच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन भ्याड हल्याचा निषेध करण्यात आला. बंदचे आवाहन करण्यात आल्याने येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील सर्व दुकाने तसेच गावातील प्रमुख बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांनी उत्सफुर्तपणे आपले व्यवहार बंद ठेवले. मारवाडी पेठ, बाजार गल्ली या प्रमुख पेठांमध्ये बंदमुळे शुकशुकाट जाणवत होता. तीनपाटीवर सर्वपक्षीय तसेच नागरिकांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करु न शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कैलास सोनवणे, संजय शेवाळे, दादाभाई काद्री, नितीन गायकवाड, रमेश सालगुडे, रणजीत गुंजाळ, महेंद्र पुंड, ईब्राहीम मोमीन, नागरे यांनी भ्याड हल्याचा निषेध केला. याप्रसंगी ज्ञानेश्वर पवार ,काकासाहेब दरेकर, नानासाहेब जेऊघाले, निलेश दरेकर, सचिन दरेकर, मनोज धारराव, योगेश खुळे, ज्ञानेश्वर शिरसाठ, अनिल विंचूरकर, प्रकाश काकड, गोरख सोनवणे, राहुल कापसे, पप्पु शेख,सुनिल ताजणे, दिपक राऊत, दिपक पुंड, हिरामन पेखळे, भाऊराव सांगळे, भुषण रांधव, अमोल खापरे, गिते, शेख, मोमीन, ठुबे, लोहारकर उपस्थित होते.
विंचूर येथे कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 2:09 PM