मालेगाव : राजस्थान उच्च न्यायालयाने जलप्रदुषणामुळे कापड प्रक्रिया उद्योगावर मर्यादित कालावधीसाठी लावलेले निर्बंध आणि दक्षिण आफ्रिकेत चलनदरात झालेली घट या पार्श्वभूमीवर येथील जवळपास दोन लक्ष यंत्रमागांचा खडखडाट आज बंद राहिला. तीन दिवसीय बंदपैकी शुक्रवारच्या साप्ताहिक सुट्टीनंतर बंदचा आज शनिवारी दुसरा दिवस होता. या बंदमुळे शहरातील यंंत्रमाग उद्योगावरील सध्याचे मंदीचे सावट स्पष्ट व गडद झाले आहे. गेल्या बुधवारी रात्री आठवड्यातून तीन दिवस यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय येथील यंत्रमाग कारखानदारांनी घेतला होता. त्यानुसार सदर बंद पाळण्यात आला. या बंदमुळे या व्यवसायातील प्रत्यक्ष एक लक्ष यंत्रमाग कामगारांना कामाविना रहावे लागले. येत्या दोन जून ते सात जूनदरम्यान पुन्हा आठवडाभराचा बंद पाळण्यात येणार आहे. परिणामी शहराची अर्थव्यवस्था अधिक मंदावण्याची तसेच यंत्रमाग व पुरक व्यवसायातील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मालेगावी यंत्रमागांचा खडखडाट बंद
By admin | Published: May 23, 2015 11:22 PM