त्र्यंबकेश्वर : सीएम चषक अंतर्गत विविध स्पर्धांच्या बक्षिस वितरण सोहळा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या उपस्थितीत पार पडला. भारतीय जनता युवा मोर्चा त्र्यंबकेश्वरच्यावतीने त्र्यंबकेश्वर इगतपुरी विधानसभास्तरीय सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अटल स्वरांजली देशभक्ती व भक्ती संगीताचे आयोजन करण्यात आले होते. विजेता स्पर्धकांनी म्हटलेल्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड.श्रीकांत गायधनी, ज्येष्ठ नेते बाबुराव थेटे, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, विस्तारक नितीन जाधव, नगरसेवक विष्णू दोबाडे, दिपक लोणारी विक्र म धोंडगे, नगरसेविका माधवी भुजंग, सायली शिखरे, शीतल उगले, अनिता बागुल, शिल्पा रामायणे, संगीता भांगरे, भारती बदादे, त्रिवेणी तुंगार, तृप्ती धारणे, मेघा दीक्षित, वैष्णवी वाडेकर, संतोष भुजंग, हर्षल भालेराव, शांताराम बागुल, सत्यप्रिय शुक्ल, भाऊराव डगळे , राजेश शर्मा, कमलेश जोशी आदी मान्यवरांचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.गेल्या महिन्याभरापासून कला व क्र ीडा स्पर्धेच्या महोत्सवामध्ये ३५०० स्पर्धकांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. बारा प्रकारचे विविध मैदानी व कला स्पर्धांचे विजेत्यांना यावेळी रोख स्वरूपात पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. भाजयुमोचे अध्यक्ष तथा इगतपुरी विधानसभेचे संयोजक सुयोग वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, तालुकाध्यक्ष कौशल्या लहारे , विनायक माळेकर, भाऊराव डगळे उपस्थिथ होते.कार्यक्र माचे प्रमुख वक्ते केशव उपाध्ये यांनी विजेत्यांचे मनोबल वाढवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टीतून सीएम चषक ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये भरवली. छोट्या स्क्र ीनवर अडकलेले तरु ण आज मैदानात खेळताना दिसताय व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता सीएम चषक हे हक्काचे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
त्र्यंबकेश्वरला सीएम चषक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 3:36 PM