नाशिक : केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरण पूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीतील सीएनजी गॅस कंपनी च्या वतीने इंदिरानगर परिसरापासून सर्व्हेक्षणला सुरुवात करण्यात आली आहे.महापालिका हद्दीतील इंदिरानगर परिसरात दोन दिवसांपासून सीएनजी कंपनीच्याद्वारे परिसरात सर्वे ला सुरुवात करण्यात आली. या सर्वेमध्ये गुगल द्वारे व नकाशा पाहून सोसायटी, अपार्टमेंट व कॉलनी परिसरात किती सदनिका व बंगले आहे याची पाहणी करण्याचे काम करण्यात येत आहे. सदर काम तीन कंपनीला देण्यात आले आहे त्यांचे कर्मचारी पाहणी करून त्याची नोंद करून पॉईंट ठरवीत आहे तसेच घरगुती आणि व्यावसायिक असे दोन प्रकारचे सर्वे करण्यात येत आहे. त्यामध्ये वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेले सुमारे सात ते आठ प्रकल्प असून त्या प्रत्येक प्रकल्पात सुमारे पाचशे ते सहाशे सदनिका असून त्यांना गॅस जोडणीस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार गुरुकृपा सोसायटी, वडाळा पाथडी रस्त्यालगत असलेले सुमारे दोन ते तीन मोठ्या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यात संपूर्ण नाशिक शहरातील सर्वे करण्यात येणार असून त्यानंतर पुढील सहा महिन्यात गॅस जोडणी साठी लागणारी पाईपलाईन सुमारे पाच ते सहा फूट खोदकाम करून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर मागेल त्याला गॅस जोडणी पाईपलाईनद्वारे करण्यात येणार आहे. सध्या गॅस सिलेंडर १४ किलोचा सुमारे ९५० रुपयास मिळते त्यातील सबसिडी संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा होते. सीएनजी गॅस कंपनी द्वारे सुमारे १४ किलो गॅस सुमारे साडे तीनशे रुपयाला पडणार असल्याचे गॅस कंपनीच्या सुत्रांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रीयासीएनजी गॅस जोडणीमुळे मोठ्या गृह प्रकल्पास दिलासा मिळेल तसेच सहा महिन्यात स्टेशन सुरु करण्यात येईल एक वषार्नंतर गॅस जोडणी सुरुवात करण्यात येणार आहे.-राकेश आढाव- प्रकल्प व्यवस्थापक