नाशिक : सहकारात असलेल्या चांगल्या गोष्टींचा फायदा घेऊन सहकारी बँकांनी आपली विश्वासार्हता निर्माण करून ग्राहकांपर्यंत पाेहोचून आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, अद्यापही १८ कोटी लोकसंख्या अशी आहे ज्यांच्यापर्यंत कोणत्याही वित्तीय संस्था पोहोचलेल्या नाहीत अशा लोकांपर्यंत खासगी वित्तीय संस्था पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सहकारी बँकांनीही आपला शाखा विस्तार करून अशा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी व्यक्त केले. गोदावरी अर्बन बँकेच्या वतीने स्व. डॉ. वसंतराव पवार यांचा स्मृती दिन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला, यानिमित्त ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस निलीमा पवार होत्या. यावेळी व्यासपीठावर हेमंत राठी, अजय ब्रह्मेचा, विश्वास ठाकूर, प्रकाश पाठक आदी मान्यवरांसह गोदावरी बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ठाकूर म्हणाले की, शंभर वर्षांपूर्वी आपली सामाजिक परिस्थिती जशी होती ती तशीच आजही आहे. त्याकाळी केवळ १ टक्का लोकांच्या हाती संपत्ती होती, तशीच ती आजही आहे. त्याकाळी सावकारी पाशातून सर्वसामान्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकाराची चळवळ उभी राहिली आज नवीन पद्धतीची सावकारी उभी राहिली आहे. देशात सहकाराचे जाळे मोठे असले, तरी केवळ तीन टक्कयांपर्यंत बँकिंग व्यवसाय आहे तो वाढविणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या लोकांना सहकार क्षेत्र मदत करते हे आपण जगाला सांगायला हवे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून डॉ. वसंत पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अमृता पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर वसंत खैरनार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सहकारी बॅंकांनी आपली विश्वासार्हता निर्माण करावी : गौतम ठाकूर:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 1:45 AM
सहकारात असलेल्या चांगल्या गोष्टींचा फायदा घेऊन सहकारी बँकांनी आपली विश्वासार्हता निर्माण करून ग्राहकांपर्यंत पाेहोचून आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, अद्यापही १८ कोटी लोकसंख्या अशी आहे ज्यांच्यापर्यंत कोणत्याही वित्तीय संस्था पोहोचलेल्या नाहीत अशा लोकांपर्यंत खासगी वित्तीय संस्था पोहोचण्याचा प्रयत्न करतात. सहकारी बँकांनीही आपला शाखा विस्तार करून अशा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देपवार स्मृती दिनानिमित्त व्याख्यानात प्रतिपादन