भाऊसाहेबनगर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुका चौथ्यांदा लांबणीवर पडल्या असून आता ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे.३१ मार्च २०२० ला कोविडमुळे निवडणुकीसाठी स्थगिती प्रथम दिली गेली. त्यानंतर १७ जून २०२०, १६ व २८ सप्टेंबर २०२० ला आदेशान्वये निवडणुका लांबविल्या गेल्या.बिहार निवडणूक आणि ग्रामपंचायत निवडणुका झाल्याने सहकारी संस्थेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सहकारमंत्री यांनी ३१ मार्चपर्यंत निवडणुका होणार नाहीत, असे जाहीर केले होते. मात्र, प्राधिकरण जे या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम राबविते त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश काढला होता.यानुसार जानेवारीपासूनच ज्या स्थितीला कार्यक्रम स्थगित केला. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होऊ लागणार होत्या. मात्र, आता चौथ्यांदा निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली असून ३१ मार्चपर्यंत विद्यमान कार्यकारी मंडळींना काम बघावे लागणार आहे.
सहकारी संस्था निवडणुका पुन्हा लांबणीवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 6:07 PM
भाऊसाहेबनगर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुका चौथ्यांदा लांबणीवर पडल्या असून आता ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे.
ठळक मुद्देजानेवारीपासूनच कार्यक्रम स्थगित केला.