शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Published: October 06, 2016 1:38 AM

प्रभाग ४१ : तिडकेनगर, प्रियंका पार्क रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

सिडको : येथील तिडकेनगर, प्रियंका पार्क परिसरातील मोकळ्या भूखंडांवर वर्षानुवर्षे साचलेला व कुजलेला कचरा आणि पालापाचोळ्यासह एका सोसायटीच्या तळमजल्यात वाढलेल्या झुडपांमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून, याबाबत आज पाहणी करण्यासाठी आलेल्या मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घातला.सिडकोतील प्रभाग ४१ मध्ये तिडकेनगर, प्रियंका पार्क या परिसराचा समावेश असून, याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. याच भागात असलेल्या एका सोसायटीच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली असून, पाण्याची साठवणूकही केली असल्याने अनेकजण विविध आजारांनी त्रस्त असून यात काहींना डेंग्यू आजाराची लागण झाल्याचेही यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. याबाबत आज मनपाचे आरोग्य अधिकारी टेकाडे व विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी तिडकेनगर, प्रियंका पार्क व परिसरात फिरून समस्यांची पाहणी केली. यावेळी पाहणी दौऱ्यात उपस्थित शेकडो नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत घेराव घातला. यावेळी या अधिकाऱ्यांनी संबंधितांना स्वच्छता करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी परिसरातील संजय जाधव, सुनील चौधरी, बबन नवले, सुभाष पाटील, डॉ. पराग सुपे, अमृतराव माळे, नाना खैरनार, सुजित काळसेकर, रमेश चौहान, प्रियंका सरोदे, जयंत चौधरी, प्रशांत कुलकर्णी, संगीता चोपडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)