पेठ - नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून दररोज या मार्गावर वाहतूक खोळंबल्यामुळे चक्काजाम होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.शुक्र वारी (दि.५) सकाळी पेठ नजिक कोटंबी घाटातील अवघड वळणावर दोन अवजड वाहने समोरासमोर आल्याने जवळपास तासभर वाहतूक खोळंबली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. दोन दिवसांपूर्वी बोरवठ फाटयावर अशाच प्रकारे अपूर्ण रस्ता कामामुळे वाहने चिखलात अडकून दोन तास खोळंबली होती. गत तीन वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मातीच्या भरावरून अवजड वाहने चालवतांना अंदाज न आल्याने पलटी होतांना दिसून येत आहेत. शिवाय कच्चा रस्त्यावर कोणत्याही प्रकारची डागडूजी केली जात नसल्याने वाहनधारकांना चिखल व खड्डयातून वाट काढावी लागते.
कोटंबी घाटात चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:03 PM
गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे तीन तेरा
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी बोरवठ फाटयावर अशाच प्रकारे अपूर्ण रस्ता कामामुळे वाहने चिखलात अडकून दोन तास खोळंबली होती