नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात येऊन नगरपालिकांचे पदाधिकाºयांची वाहने तातडीने जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, मेळावे, बैठकांना मज्जाव करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांनाही सूचना देण्यात आले असून, तसेच सहा नगरपालिकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या नेमणुकाही करण्यात आल्या आहेत. ४भगूर, सिन्नर, मनमाड, नांदगाव, येवला व सटाणा अशा सहा नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आपल्या आदेशातच म्हटले आहे की, ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिकेची निवडणूक होत असेल त्या जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यासाठीच आचारसंहिता जारी करण्यात येत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासूनच आचारसंहिता जारी करण्यात आल्याने सायंकाळीच नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी लोकप्रतिनिधींचे वाहने ताब्यात घेतले तसेच त्यांच्या नगरपालिकेतील कार्यालयांनाही कुलपे ठोकली. जिल्ह्यातील सहाही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकाºयांनी निवडणूक निर्णयवर तसेच सहायक निवडणूक अधिकाºयांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत. त्यात मनमाडसाठी मालेगावचे प्रांत अधिकारी अजय मोरे, नांदगावसाठी चांदवडचे प्रांत भीमराज दराडे, येवल्यासाठी भूसंपादन अधिकारी स्वाती थवील, सिन्नरसाठी पुनर्वसन अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड, भगूरसाठी इगतपुरीचे प्रांत राहुल पाटील व सटाण्यासाठी प्रांत अधिकारी प्रवीण महाजन यांचा समावेश आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे यंदा पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्णासाठी निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली असून, यापूर्वी फक्त त्या त्या नगरपालिका क्षेत्रापुरतीच त्याची अंमलबजावणी केली जात होती. याशिवाय नगरपालिकेसाठी आॅनलाइन नामांकन भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात आचारसंहिता लागू
By admin | Published: October 18, 2016 3:17 AM