नाशिक : महाराष्टÑ शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी गेल्या २५ तारखेला जाहीर झाल्यानंतर दुसरी यादीची प्रतीक्षा असताना जिल्ह्णातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे सदर यादी थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून शासनाने निवडणुका असलेल्या जिल्ह्णातील कर्जमुक्तीची यादी स्थगित केली असून, यावर मार्ग काढण्यासाठी उच्च पातळीवर विचारविनिमय केला जात आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी राज्य सरकारने जाहीर केली होती. पहिल्या यादीत नाशिक जिल्ह्णातील सोनांबे आणि चांदोरी या दोन गावांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. या दोन्ही गावांतील ७७८ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात आली आणि त्यांचे प्रमाणिकीकरणदेखील करण्यात आल्याने त्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली आहे. योजनेतील दुसरी यादी २८ तारखेला जाहीर होणार असल्याचे राज्य शासनाकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे दुसºया यादीत किती गावे अािण किती शेतकºयांना सामावून घेतले जाते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र जिल्ह्णातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे दुसरी यादी जाहीर होऊ शकली नाही.जिल्ह्णातील १ लाख ४७ हजार शेतकºयांना योजनेचा लाभ होणार आहे. त्यामुळे साहजिक जिल्ह्णातील शेतकºयांचे डोळे यादीकडे लागले होते. परंतु सायंकाळपर्यंत जिल्ह्णातील कर्जमुक्ती गाव आणि शेतकºयांची यादी जाहीर होऊ शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्णातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू झाल्ल्या आहेत. गेल्या २७ तारखेला निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आली. निकाल ४ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे कर्जमुक्तीची दुसरी यादी आचारसंहितेत अडकल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्णात कळवण २९, येवला-२५, दिंडोरी ४४, इगतपुरी ४ अशा १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.निवडणुकीची माहिती रवानाजिल्ह्णातील कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर होऊ शकली नसल्याने शेतकºयांमध्ये काहीशी चिंता निर्मााण झाली आहे. पहिल्या यादीत जिल्ह्णातील दोन गावांचा समावेश होता. दुसºया यादीत सहा गावांची नावे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र जिल्ह्णात आचारसंहिता असल्याने राज्य शासनाने जिल्ह्णातील निवडणुका आणि निवडणूक कार्यक्रमाची माहिती मागवून घेतली आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी योजना जाहीर असल्याने लाभार्थ्यांची नावे जाहीर करण्यासंदर्भात शासनाकडून येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
आचारसंहितेमुळे कर्जमुक्ती यादी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:28 AM
महाराष्टÑ शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी गेल्या २५ तारखेला जाहीर झाल्यानंतर दुसरी यादीची प्रतीक्षा असताना जिल्ह्णातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे सदर यादी थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून शासनाने निवडणुका असलेल्या जिल्ह्णातील कर्जमुक्तीची यादी स्थगित केली असून, यावर मार्ग काढण्यासाठी उच्च पातळीवर विचारविनिमय केला जात आहे.
ठळक मुद्देप्रतीक्षा : शासनाने जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागविली