शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

आचारसंहितेचा अडसर नाही

By admin | Published: January 05, 2017 1:45 AM

प्रशासनाची ग्वाही : अकरा घरकुले बांधण्याचा मार्ग मोकळा

 नाशिक : पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात बांधावयाच्या सुमारे ११ हजार घरकुलांचा मार्ग मोकळा झाला असून, या घरकुले उभारणीस आचारसंहितेचा अडसर नसल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या घरकुलांच्या पात्र लाभार्थींची निवड केली असून, लवकरच या घरकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.आचारसंहिता तोंडावर येऊन ठेपल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची विकासकामे मंजूर करून त्यांना कार्यारंभ आदेश देण्याची धावपळ सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी असलेल्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत जिल्ह्णात सुमारे ११ हजार घरकुलांचे बांधकाम करावयाचे आहे. त्यासाठी सुरुवातीला लाभार्थीच सापडत नसल्याचे चित्र होते. या अकरा हजार घरकुल लाभार्थींमध्ये सर्वाधिक पात्र लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गातील असल्याचे समजते. आता लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्याने या पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुलांचे प्रत्यक्ष बांधकाम करणे अडचणीचे ठरू शकते. याची कल्पना प्रशासनाला आल्याने प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील लाभार्थींची निवड अंतिम करीत त्यास मान्यता दिली. त्यानंतर या घरकुलांच्या प्रस्तावांना तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन या कामांचे प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश लवकरात लवकर काढावेत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला दिले आहे. आचारसंहिता लागू झाली तरी या घरकुल बांधकामांना कोणतीही अडचण येणार नसल्याचा निर्वाळा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला.(प्रतिनिधी)