शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

अखेरच्या सेवेसाठी शवपेटी, निफाड ग्रामस्थांची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 1:07 PM

निफाड : मानवी जीवनात मृत्यू हे एक अटळ सत्य आहे . मृत्यूनंतरही मानवाचा देह अंत्यविधीपर्यंत चांगला ठेवण्याचे प्रयत्न कुटुंबीयांकडून होत असतात. काही वेळा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह रात्रभर किंवा ६ ते ७ तास घरात ठेवावा लागतो या कालखंडात मृतदेह व्यवस्थित राहावा या हेतूने निफाडकर ग्रामस्थांनी शवपेटीची व्यवस्था केली आहे.

निफाड : मानवी जीवनात मृत्यू हे एक अटळ सत्य आहे . मृत्यूनंतरही मानवाचा देह अंत्यविधीपर्यंत चांगला ठेवण्याचे प्रयत्न कुटुंबीयांकडून होत असतात. काही वेळा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह रात्रभर किंवा ६ ते ७ तास घरात ठेवावा लागतो या कालखंडात मृतदेह व्यवस्थित राहावा या हेतूने निफाडकर ग्रामस्थांनी शवपेटीची व्यवस्था केली आहे. यंदा राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगली भागाचे प्रचंड नुकसान झाले होते. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी निफाडमधील सर्व युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था एकत्र आल्या. सर्वांनी या पूरग्रस्तांना अगदी भरपूर मदत करून सामाजिक जाणीव जपली. पूरग्रस्तांसाठी जमलेल्या निधींपैकी काही निधी शिल्लक होता. या रकमेचा सामाजिक कार्यासाठी उपयोग व्हावा म्हणून निफाडच्या सर्व नागरिकांच्या चर्चेतून निफाडसाठी एक शवपेटी विकत घेण्याचे ठरले. हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला.निफाडमधील सर्व सामाजिक संस्था, विविध युवक मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या समन्वयाने एक शवपेटी खरेदी करून औपचारिक सेवेत दाखल झाली. एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला व मृतदेह रात्रभर ठेवण्याची वेळ येईल तेव्हा त्या कुटुंबाच्या मागणीनुसार ही शवपेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी राबविलेले उपक्र म निश्चितच प्रेरणादायी असतात. निफाड गावातील नागरिकांनी सदर कार्यात सहभाग घेत सामाजिक जाणीव जपली.

टॅग्स :Nashikनाशिक