नाशिक : बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून, सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. थंडी तर कधी अचानकपणे वाढणारे ऊन यामुळे वातावरण असंतुलित झाल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाºया नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या कमाल तपमानात वाढ होण्यास सुरुवात झाल्याने उन्हाचा चटका जाणवत होता. सकाळी ८ वाजेपासून कडक ऊन पडत होते. सलग दहा ते बारा दिवस कमाल तपमान वाढल्यामुळे थंडी गायब होऊन उन्हाळा सुरू झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला होता; मात्र पुन्हा दोन दिवसांपूर्वी कमाल तपमानाचा पारा घसरून पारा दहा अंशांवर आल्याने थंडी जाणवू लागली होती. दोन दिवस किमान तपमान घसरलेले असताना मंगळवारपासून पुन्हा पारा वर सरकू लागला आहे. मंगळवारी (दि.२३) किमान तपमान १२.६ अंश, तर कमाल तपमान २८ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच थंडी-ऊन कमी जास्त होऊ लागल्याने वातावरणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. वातावरण बदलाचा हा फटका नागरिकांना बसू लागला असून, काही नागरिकांना सर्दी-पडसे व खोकल्याचा त्रास होऊ लागला आहे. खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. दिवसा उनापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, हॅट किंवा सनग्लास वापरावा तसेच महिलांनी सनकोट स्कार्फचा वापर करावा तसेच संध्याकाळीदेखील ऊबदार कपडे वापरावे जेणेकरून उन्हाचा चटका व थंड वाºयापासून बचाव होऊ शकेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. खोकला किंवा सर्दीचा त्रास होत असल्यास पाणी उकळून पिण्यास प्राधान्य द्यावे. दुचाकीवर प्रवास करताना नाकातोंडाला रुमाल बांधण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.तपमानात सातत्याने चढ-उतार शहराच्या किमान तपमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बुधवारी (दि.२४) किमान तपमान ८.८इतके होते तर गुरूवारी (दि.२५) तपमान कमालीचे घसरले आणि ७.२ इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाली. या हंगामातील हे सवार्धिक कमी नीचांकी तपमान ठरले. शुक्रवारी (दि.२६) तपमानात काही अंशी वाढ होऊन ८ अंश इतके तपमान नोंदविले गेले. शनिवारी (दि.२७) ८.८ इतके किमान तपमान होते. एकूणच सातत्याने घसरणाºया किमान तपमानासोबत कमाल तपमानात मात्र या आठवड्यात सतत वाढ होत गेल्याने कमाल तपमानाचा पारा २८ अंशावरून पुरे ३०.६ अंशापर्यंत सरकला आहे. एकूणच नाशिककरांना सध्या कडाक्याच्या ऊन्हासोबत कडाक्याची थंडीही अनुभवयास येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे.
हवामान बदलाने सर्दी-खोकल्याचा वाढला त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:53 PM