नाशिक : किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी (दि.१६) १०.५ इतके किमान तपमान तर २५.८ इतके कमाल तपमान नोंदविले गेले. त्यामुळे नाशिककरांना पहाटेपासून दुपारपर्यंत हुडहुडी जाणवत होती. संध्याकाळी पाच वाजेनंतर वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला होता.मागील सहा दिवसांपासून शहराचे किमान तपमान दहा अंशाच्या आसपास स्थिरावत आहे. गेल्या मंगळवारी (दि.११) हंगामातील नीचांकी ९.४ इतक्या तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने तपमान दहा अंशाच्या जवळपास राहिले. किमान तपमान १०.५अंशापर्यंत खाली घसरल्याने रविवारी पहाटेपासून थंडीचा कडाका जाणवत होता. कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून घसरण सुरूच आहे. कमाल तपमान तीशीपार होते; मात्र आता थेट पंचवीशीपर्यंत खाली आल्याने वातावरणातील उष्मा संपुर्णत: गायब झाला असून थंडीची तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे. संध्याकाळपासूनच शीतलहर जाणवू लागली होती. साडेपाच वाजेनंतर वातावरणात गारठा अधिकच वाढला. रात्री दहा वाजेनंतर थंड वारे अधिकच वेगाने वाहू लागले होते. यामुळे नागरिकांनी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. रविवारची सुटी असूनदेखील संध्याकाळी साडेसात वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून आला.
थंडीचा कडाका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:05 AM
किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी (दि.१६) १०.५ इतके किमान तपमान तर २५.८ इतके कमाल तपमान नोंदविले गेले. त्यामुळे नाशिककरांना पहाटेपासून दुपारपर्यंत हुडहुडी जाणवत होती.
ठळक मुद्देगारठा : किमान अन् कमाल तपमानात घसरण