वणी : प्रचंड थंडीमुळे द्राक्ष खरेदीदार व्यापाऱ्यांची खरेदीची गती मंदावल्याचे चित्र असून, द्राक्ष खरेदी-विक्र ीची गती वाढण्याची अपेक्षा असताना थंडीमुळे तापमान घसरल्याने खरेदीदार परप्रांतीय व्यापाºयांनी सावध पवित्रा घेतला असून, द्राक्षखरेदी चा वेग कमी केल्याने प्रतिकुल वातावरण निवळण्याची प्रतिक्षा उत्पादकाना आहे. दिंडोरी तालुक्यातील काही भागांमधे परप्रांतीय व्यापारी द्राक्ष खरेदीसाठी डेरेदाखल झाले आहेत. सद्यस्थितीच्या कालावधीत परराज्यात द्राक्ष विक्र ी व्यापारी वर्ग करतात विक्र ी करण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील दर्जेदार द्राक्षे खरेदी करण्याकडे उत्पादकांचा कल असतो. या व्यापारीवर्गीय ग्राहक प्रामुख्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, नोयडा गुजरात येथे आहेत. त्यात गुजरातच्या तुलनेत इतर ठिकाणी मोठी मागणी असते हा प्रतिवर्षीचा अनुभव मात्र वर्तमान स्थितीत त्या भागांमधे प्रचंड थंडीचे वातावरण आहे. त्यामुळे तेथील स्थानिक बाजारामधे प्रतिकुल वातावरणामुळे द्राक्ष खरेदीसाठी ग्राहकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे स्वाभाविकत: घाउक द्राक्षे खरेदी करणार्या घटकांवर याचा परिणाम झाला आहे. परप्रांतीय खरेदीदार व्यापारी परराज्यातील स्थानिक ठिकाण चा घाऊक खरेदीदार त्यांचेकडुन खरेदी करणारे किरकोळ व्यापारी व शेवटी ग्राहक अशा सर्व साखळी प्रक्रि येवर याचा परिणाम होत असल्याची माहिती देण्यात आली. थॉमसन, सोनाका, काळी अशा जातीच्या द्राक्षांची खुडणी काही भागात सुरू आहे. मात्र परराज्यातील द्राक्ष विक्र ीचा वेग मंदावल्याने सध्या तालुक्यातील काही ठिकाणी सुरू असलेल्या खुडणीची गती काहीशी मंदावल्याने द्राक्ष उत्पादकांना परराज्यातील वातावरण निवळण्याची प्रतीक्षा आहे.
थंडीमुळे द्राक्ष खरेदी मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 11:22 PM
वणी : प्रचंड थंडीमुळे द्राक्ष खरेदीदार व्यापाऱ्यांची खरेदीची गती मंदावल्याचे चित्र असून, द्राक्ष खरेदी-विक्र ीची गती वाढण्याची अपेक्षा असताना थंडीमुळे तापमान घसरल्याने खरेदीदार परप्रांतीय व्यापाºयांनी सावध पवित्रा घेतला असून, द्राक्षखरेदी चा वेग कमी केल्याने प्रतिकुल वातावरण निवळण्याची प्रतिक्षा उत्पादकाना आहे.
ठळक मुद्देद्राक्ष उत्पादकांना परराज्यातील वातावरण निवळण्याची प्रतीक्षा