शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

नाशिकला थंडीचा कडाका; तपमानाचा पारा ८.५अंशापर्यंत घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 2:45 PM

आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली राहत आहे. एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्दे या हंगामातील आजची नोंद ही नीचांकी ठरली.आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले

नाशिक : किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच असून शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी (दि.१६) १०.५ इतके किमान तपमान तर २५.८ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते; मात्र आज सोमवारी सकाळी किमान तपमान८.५इतके मोजण्यात आले. या हंगामातील आजची नोंद ही नीचांकी ठरली. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशाच्या खाली राहत आहे. एका दिवसात दोन अंशांनी तपमानात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ९.४ अंश इतकी या हंगामातील नीचांकी नोंद ठरली होती.नाशिककरांना पहाटेपासून दुपारपर्यंत हुडहुडी जाणवत होती. संध्याकाळी पाच वाजेनंतर पुन्हा गारवा वाढण्यास सुरूवात होते. रात्री उशिरापर्यंत हुडहुडी नागरिकांना सहन करावी लागत आहे. मागील सहा दिवसांपासून शहराचे किमान तपमान दहा अंशाच्या आसपास स्थिरावत आहे. गेल्या मंगळवारी (दि.११) हंगामातील नीचांकी ९.४ इतक्या तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने तपमान दहा अंशाच्या जवळपास राहिले. किमान तपमान १०.५अंशापर्यंत खाली घसरल्याने रविवारी पहाटेपासून थंडीचा कडाका जाणवत होता. कमाल तपमानात मागील पाच दिवसांपासून घसरण सुरूच आहे. कमाल तपमान तीशीपार होते; मात्र आता थेट पंचवीशीपर्यंत खाली आल्याने वातावरणातील उष्मा संपुर्णत: गायब झाला असून थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. सोमवारी किमान तपमानाचा पारा ८.५अंशापर्यंत घसरल्याने शहरात थंडीने कहर केला आहे. नाशिक शहरात ८.५ तर जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पारा थेट ७.२ अंशापर्यंत खाली घसरला आहे. संध्याकाळी सात वाजेनंतर थंड वाऱ्याचा वेग वाढत असल्यामुळे किमान तपमानात घट होत आहे. उत्तर भारतासह जम्मु-काश्मिरमध्ये थंडीने हाहाकार माजविला असून किमान तपमान काश्मिर खोºयात उणे५पर्यत पोहचले असून उत्तर भारतात किमान तपमान ५ अंशापर्यंत खाली आले आहे. यामुळे उत्तर महाराष्टÑातही थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात ८.३ , जळगावमध्ये ८.४ नाशिकमध्ये ८.५ तर अहमदनगरमध्ये ८.७ इतक्या किमान तपमानाची सोमवारी सकाळी नोंद झाली. राज्यातील ही शहरे थंडीने गारठली आहेत. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी किमान तपमान १०.४ तर साता-यात ११.४ इतके किमान तपमान नोंदविले गेले.वाढत्या थंडीमुळे नागरिक पहाटे व रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्येही शुकशुकाट मागील चार दिवसांपासून दिसून येत आहेत. संध्याकाळी सात वाजेनंतर रस्ते निर्मनुष्य होऊ लागतात. तसेच दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. सहा ते सात दिवसांपासून शहर गारठले असून नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला असून सर्दी-पडशाचे रुग्ण वाढू लागले आहे.नाशिकचे किमान तपमान दृष्टिक्षेपातसोमवार (दि.१०) - १२.८मंगळवार (दि.११) - ९.४बुधवार (दि.१२) - ९.६गुरूवार (दि.१३)- ११.०शुक्रवार (दि.१४)- १०.४शनिवार (दि.१५)- १०.६रविवार (दि.१६)- १०.५सोमवार (दि.१७)- ८.५ 

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान