कळवण: तालुक्यासह पुनद खोºयात पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने ग्रामीण भागातील गावागावात शेकोट्या पुन्हा पेटू लागल्याने थंडी मुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.थंड वारा व थंडी मुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम दिसून येत असल्याने कांदा, गहु, हरभरा आदी पिकांवर परिणाम होत असून कांदा पिकावरील फवारण्या वाढू लागल्या आहेत. रब्बी पिकांसाठी ही थंडी पोषक समजले जाते मात्र वाढत्या थंडीमुळे व गार वारा तसेच ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रब्बी पिकांना धोका निर्माण होत आहे.उत्तर भारतातील हवामान बदलाचा फटका महाराष्ट्राला बसत आहे. महिनाभरापासून सुरु असलेल्या थंडीच्या लाटेने मध्यंतरी उसंत घेतली होती. मात्र जानेवारी अखेरच्या टप्प्यात पारा घसरत चालला आहे. सोमवारी सकाळी ८.१ अंशापर्यत खाली घसरला होता.तालुक्याभरात हवामान बदलाने जनजीवन विस्कळीत झाले असून दुपार पर्यंत हवेत गारवा होतो. सायंकाळी पुन्हा गारवा वाढत असल्याने नागरिक उबदार कपडे व शेकोट्यांचा आधार घेत थंडीपासून बचाव करीत आहेत. तर हीच थंडी गहु, हरभरा, कांदा पिकासाठी लाभदायक ठरत असली तरी वाढत्या थंडीमुळे कांदा पिकावर मावा रोगाचे अतिक्र मण वाढत आहे. त्यामुळे किटकनाशके व पोषक फवारु न माव्यावर नियंत्रण मिळविण्याचा अटोकाट प्रयन्त केला जात आहे.संपूर्ण तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने परिणामी थंडीमध्ये वाढ झालेली दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यासह पुनद खोºयातील नागरिक, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी, बालगोपाल मफलर, स्वेटर, कानटोपी, बूट हातमौजे आदी उबदार कपड्यांचा वापर करतांना दिसत आहे.वाढत्या थंडीमुळे ऊस तोडणी कामगारांचे सर्वाधिक हाल होत असून याच थंडीचा परिणाम शालेय विद्यार्थी उपस्थितीवर जाणवू लागला आहे.
कळवण तालुक्या सह पुनद खोऱ्यात थंडीचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 7:06 PM
कळवण: तालुक्यासह पुनद खोºयात पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने ग्रामीण भागातील गावागावात शेकोट्या पुन्हा पेटू लागल्याने थंडी मुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.
ठळक मुद्देपेटू लागल्या शेकोट्या : उबदार कपड्यांना पुन्हा बाजारपेठेत मागणी