शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

शीतलहरीने केला कहर अन् गारठले नाशिककर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 1:23 AM

शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून शीतलहरीने कहर केला आहे. सोमवारप्रमाणे मंगळवारी (दि. २५) सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक शहरात किमान तापमान ६.३ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठा मंगळवारी नाशकात होता. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले. सूर्यदर्शन झाले असले तरी दिवसभर वातावरणात गारवा टिकून होता.

ठळक मुद्देराज्यात नीचांकी नोंद : पारा घसरला ६.३अंशावर

नाशिक : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून शीतलहरीने कहर केला आहे. सोमवारप्रमाणे मंगळवारी (दि. २५) सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक शहरात किमान तापमान ६.३ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठा मंगळवारी नाशकात होता. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले. सूर्यदर्शन झाले असले तरी दिवसभर वातावरणात गारवा टिकून होता.

शहरात मागील दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा या दोन दिवसांमध्ये कमालीचा वेगाने घसरत आहे. कमाल तापमानातही घट होत असून मंगळवारी २३.६ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना दिवसभर थंडीची तीव्रता जाणवली. पहाटे शहरावर धुक्याची दुलई पसरलेली होती. हवेत बाष्पचे प्रमाण अधिक राहिल्याने आर्द्रताही ८२ टक्क्यांपर्यंत पोहचली. या तुलनेत संध्याकाली आर्द्रता कमी राहिली. दुपारी बारा वाजेनंतर ऊन कडक पडल्यामुळे गारठलेल्या नागरिकांची हुडहुडी कमी होण्यास मदत झाली.

अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अन् शनिवारपासून पाकिस्तानात उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या दिशेने सुरू केलेले मार्गक्रमण यामुळे शहराच्या वातावरणात या चार दिवसात कमालीचा बदला झाला आहे. सोमवारपासून शहरात ऊन चांगले पडत असल्याने थंडीचा सामना करणे नागरिकांना श्यक्य होत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन दिवसांपासून सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांकडून दिवसभर ऊबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जात आहे. गोदाघाटासह उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांकडून शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच चहालाही मागणी वाढली असून चहाविक्रीच्या दुकानांवर गर्दी दिसू लागली आहे.

---इन्फो--

१७ जाने. २०२०ची पुनरावृत्ती

मागील वर्षी १७ जानेवारी रोजी थंडीचा असाच कडाका नाशिककरांनी अनुभवला होता. त्या दिवशीही शहराचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली होती. २३ डिसेंबर रोजीसुद्धा पारा ८.२ अंशापर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले होते. ७ जाने. २०११ सालीदेखील ४.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. २०१३ सालीसुद्धा ६ जानेवारीला पारा ४.४ अंशापर्यंत खाली घसरला होता. २०१८ साली २५ जानेवारी रोजी ७.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.

--आकडेवारी--

ही शहरे गारठलेली.....

नाशिक-६.३, पुणे-८.५, मालेगाव-८.८, महाबळेश्वर-८.८, अहमदनगर-७.९, जळगाव-८.६, औरंगाबाद-८.८, बुलडाणा- ९.२, नागपूर-१०.६, अमरावती-१०.८, परभणी-१०.८, सोलापूर-११.२

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान