नाशिक : राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचा कडाका असलेले शहर म्हणून गुरूवारी (दि.२७) नोंदविले गेले. सकाळी हवामान केंद्राकडून शहराचे किमान तापमान ५.७ अंश मोजण्यात आले तर जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक कमी १.८ अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला. तापमानाची ही नोंद या हंगामातील सर्वात नीचांकी ठरली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा कडाका अधिकच जाणवत असल्याने नाशिककर गारठले आहे.मागील पंधरवड्यापासून शहरात थंडीचा जोर वाढलेला होता. बुधवारी (दि.१९) ७.९ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. अद्याप ही सर्वाधिक नीचांकी नोंद मानली जात होती; मात्र गुरूवारी पारा पुन्हा अचानक वेगाने १२.६ अंशावरून थेट ५.७ अंशापर्यंत खाली घसरला. बुधवारी संध्याकाळपासून वेगाने थंड वारे वाहू लागल्याने नाशिककर गारठून गेले होते. रात्री या थंड वाऱ्याचा वेग अधिकच वाढल्याने किमान तपमान अचानकपणे खाली कोसळले. त्यामुळे गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाशिकरांनी हाडे गोठविणाºया थंडीचा अनुभव घेतला. सकाळी शाळेत जाणा-या चिमुकल्यांपासून तर व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच कडाक्याच्या थंडीचा फटका सहन करावा लागला. गेल्या गुरूवारपासून सोमवारपर्यंत पारा दहा अंशाच्या जवळपास होता; मात्र मंगळवारी पारा १४ अंशापर्यंत वर सरकल्यामुळे नाशिककरांना दोन ते तीन दिवस थंडीपासून समाधानकारक दिलासा मिळाला होता; कारण किमान तपमानासोबत कमाल तपमानातही वाढ होऊन पारा तीशीपर्यंत पोहचला होता; मात्र अचानकपणे आलेल्या शीतलहरीमुळे पुन्हा गुरूवारी कमाल, किमान तपमानात मोठी घसरण झाली. तीशीपार गेलेले कमाल तापमना थेट २६अंशापर्यंत खाली आले.मागील वर्षी ७.५ अंश इतक्या तापमानाची नोंद डिसेंबरअखेर झाली होती. यावर्षी थेट ५.७ इतकी नोंद झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत थंडीचा कडाका प्रचंड जाणवत असून नाशिककर कडाक्याची थंडी मागील दहा ते बारा दिवसांपासून सलग अनुभवत आहेत.
थंडीचा कहर; नाशकात ५.७ तर निफाडमध्ये १.८ अंशापर्यंत घसरला पारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 3:01 PM
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा कडाका अधिकच जाणवत असल्याने नाशिककर गारठले आहे.
ठळक मुद्दे१२.६ अंशावरून थेट ५.७ अंशापर्यंत खाली घसरलामागील वर्षी ७.५ अंश इतक्या तापमानाची नोंद