लासलगाव : येथील रेल्वेस्थानकात फलाटावर थंडीत बेवारस स्थितीत सापडलेल्या एका सहा दिवसाच्या गोंडस नकोशीला मायेची ऊब देत येथील बालिका अनाथ आश्रमातील दांपत्याने माणुसकी जपली आहे.राष्टÑीय बालिका दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी (दि. २३) रात्री कडाक्याच्या थंडीत अवघ्या सात दिवसाच्या गोंडस ‘नकोशी’चा आवाज ऐकताच नंदीग्राम एक्स्प्रेसमधील दोन प्रवासी विद्यार्थी अभिजित डोळस व संदीप पाठक यांनी तातडीने धाव घेतली. रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस उपनिरीक्षक महेश महाले, टुपके व समाधान गांगुर्डे यांनी तत्परता दाखवत बालिकेला लासलगाव ग्रामीण रु ग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे, परिचारिका सोनवणे, आरोग्य कर्मचारी दिवेकर यांनी उपचार सुरू केले. काही तासात ग्रामीण रुग्णालयात त्या बालिकेला दाखल करण्यात आले. लासलगाव येथील श्री संत जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाचे संचालक दिलीप गुंजाळ व संगीता गुंजाळ यादेखील तातडीने ग्रामीण रु ग्णालयात हजर झाल्या. नकोशी झालेली ही बालिका गुंजाळ दांपत्याच्या कुशीत विसावली. जन्म दिलेल्या मातेने जरी या बालिकेची आपली नाळ तोडली असली तरी संगीता गुंजाळ यांनी मात्र माणुसकीची नाळ कायम ठेवत ममतेची एक वेगळीच किमया केली.प्रसंगावधानाचे कौतुकग्रामीण रुग्णालयात गोड, गोंडस, गुटगुटीत व अत्यंत देखणी बालिका संगीता गुंजाळ यांच्या मांडीवर अगदी आनंदात पाहून उपस्थितीतांचे डोळेही पाणावले. एकीकडे डोळ्यासमोर येते ती सोडून जाणारी माता नव्हे तर वैरिणी, तर दुसरीकडे मांडीवर घेऊन बसलेली ती अनाथाश्रमातील सांभाळ करणारी अनाथांची नाथ. रेल्वे सुरक्षा दलाचे टुपके, समाधान गांगुर्डे व प्रवासी अभिजित डोळस व संदीप पाठक यांच्या प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक होत आहे.
रेल्वेस्थानकात थंडीत कुडकुडणाऱ्या ‘नकोशी’ला मायेची ऊब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:13 PM
रेल्वेस्थानकात फलाटावर थंडीत बेवारस स्थितीत सापडलेल्या एका सहा दिवसाच्या गोंडस नकोशीला मायेची ऊब देत येथील बालिका अनाथ आश्रमातील दांपत्याने माणुसकी जपली आहे.
ठळक मुद्देमाता न तू वैरिणी : राष्टÑीय बालिका दिनाच्या पूर्वसंध्येची घटना; लासलगाव अनाथ आश्रमाने दिला आधार