शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दुय्यम निबंधक अडचणीत : २००१ पासून शासनाची लूट

By admin | Published: June 03, 2015 12:01 AM

बागलाण तालुक्यात जमीन घोटाळा

सटाणा : बागलाणच्या तहसीलदारांनी शासनाचे अधिकार स्वत:कडे ठेवून नवीन शर्तीच्या जमीन खरेदी-विक्रीस परवानगी दिल्याने बागलाण तालुक्यात चाळीस एकरवर जमीन घोटाळ्याने नांदगाव पाठोपाठ बागलाण तहसीलदार चौकशीच्या फेऱ्यात सापडले असताना, दुय्यम निबंधकानेही आराई परिसरात परस्पर शासनाचा नजराणा बुडवून नवीन शर्तीच्या जमिनींचे व्यवहार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे या जमीन घोटाळा प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.शासन नियमानुसार नवीन शर्तीच्या व इनामी जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार करताना महसूल आयुक्तांच्या परवानगीची आवश्यकता असते. तहसीलदाराने तसा प्रस्ताव पाठविल्यानंतर महसूल आयुक्तांच्या परवानगीने जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी खरेदी-विक्रीबाबत परवानगी देण्याचे आदेश तहसीलदाराला देतात. त्यानंतर दुय्यम निबंधकाला तहसीलदार खरेदी-विक्री व्यवहारासाठी पत्र देतो. त्यासाठी त्या जमिनीच्या बाजारभावाच्या पन्नास टक्के रक्कम नजराणा शासनाला भरणे बंधनकारक आहे. मात्र तहसीलदाराने शासन नियमाचे पालन न करता तालुक्यातील किकवारी खुर्द, तळवाडे दिगर, ढोलबारे, रातीर, कऱ्हे गावांतील चाळीस एकरपेक्षा अधिक जमीन खरेदी-विक्र ीला परवानगी दिली आहे. ही प्रकरणे २०१२ ते १४ या काळातील असल्याचे चौकशीत आढळले आहे. हे प्रकरण चौकशीसाठी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांच्याकडे असून, नांदगावच्या तहसीलदारांना जमीन घोटाळ्याची नोटीस बजावल्याने त्यांच्यामागे चौकशीचे ग्रहण लागले असताना, बागलाणचे तहसीलदार चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. हे प्रकरण चर्चेत असतानाच सटाणा दुय्यम निबंधक कार्यालयात आराई शिवारातही महसूल विभागाच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय नवीन शर्तीच्या जमिनीचा व्यवहार करून शासनाचा महसूल बुडविला असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या गैरव्यवहारामुळे दुय्यम निबंधक अडचणीत येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)