शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

फंडातील कर्मचार्‍यांवर टांगती तलवार

By admin | Published: May 19, 2014 11:51 PM

आरोग्य विद्यापीठ : सहा प्राध्यापकांना दाखविला घरचा रस्ता

आरोग्य विद्यापीठ : सहा प्राध्यापकांना दाखविला घरचा रस्तासंदीप भालेराव/ नाशिक - २०१७ मध्ये फंडातील कर्मचार्‍यांची मुदत संपणार असून त्यांना यापुढे मुदतवाढ न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ फंडातील सहा प्राध्यापकांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ न देता कामावरून कमी करून विद्यापीठाने प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात केल्याचेही दाखवून दिले आहे. या प्रकारामुळे फंडातील कर्मचार्‍यांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठात काही पदे शासनस्तरावरील असून काही पदे विद्यापीठ फंडातून भरली आहेत. फंडातील कर्मचार्‍यांचा करार हा पाच वर्षांसाठी आहे. साधारणपणे दिड वर्षापूर्वी फंडातील कर्मचार्‍यांची पाच वर्षांची मुदत संपल्याने त्यांना नोकरीवरून कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु कर्मचार्‍यांच्या रेट्यामुळे मोठ्या मुश्किलीने त्यांना २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. हे कर्मचारी २०१७ मध्ये पुन्हा नोकरीवर दावा सांगण्याची शक्यता गृहित धरून विद्यापीठाच्या प्रशासन विभागाने या कर्मचार्‍यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची तयारी चालविली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार फंडातील कर्मचार्‍यांना भविष्यात नोकरीचा दावा, तसेच नोकरीसाठी न्यायालयात न जाण्याचे शपथेवर सांगावे लागणार आहे. गेल्या १६ रोजी विद्यापीठ फंडातील सहा प्रोफेसरांची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ न देता त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. याचाच अर्थ विद्यापीठ यापुढे कुणालाही मुददवाढ देण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे विद्यापीठ फंडातील कर्मचार्‍यांमध्ये काहीशी चलबिचल निर्माण झाली आहे. विद्यापीठात सुमारे ३०० पेक्षा जास्त कर्मचारी हे विदयपीठ फंडातील आहेत. विशेष म्हणजे विदयापीठातील सर्व महत्वाच्या ाविभागात हे कर्मचारी कुशलतेने काम करीत आहेत. त्यांचा आजवरचा अनुभव विद्यापीठासाठी उपयुक्त ठरत असतांनाही याच कर्मचार्‍यांच्या मुळावर विद्यापीठ उठल्याने कर्मचार्‍यांमध्ये नुतन कुलसचिवांविषयी संताप आहे. कुलसचिवांवर नाराजीविद्यापीठाचे नुतन कुलसचिव यांनी पदभार घेतल्यानंतर ज्यांचा कार्यकाळ पुर्ण झाला अशा अंदाजे १२ ते १५ प्राध्यापकांना कामावरून कमी केले आहे. तसेच यापुढे फंडातील कर्मचार्‍यांना देखील मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या कर्मचार्‍यांनी कुठेही दाद मागू नये यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचीही शक्कल लढविली आहे.त्यानुसार या कर्मचार्‍यांना न्यायालयात देखील जाता येणार नाही की, आंदोलन, मोर्चे काढता येणार नाही. त्यामुळे नोकरीवर गदा आल्याने या कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.