नाशिक : हिवताप नियंत्रण, शहरी आरोग्य केंद्राचे सहा पथकांकडून वडाळागावात सर्वेक्षणादरम्यान एकूण ३४१ घरांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३३ चिकुणगुण्यासदृश रुग्णांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले. तसेच पाच रुग्णांचे रक्तजल नमुनेही घेण्यात आले. दरम्यान, ७८५ घरगुती पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी २१ पाणीसाठ्यांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. या सर्व पाणीसाठ्यांमध्ये किटकनाशक प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात आली. तसेच तुंबलेल्या गटारी व दूषित पाणीपुरवठ्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
वडाळागावात ३३ रुग्णांचे रक्तनमुने संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:04 AM