नाशिक : दीड दिवसाच्या गणपती मूर्तींचे संकलन करून ‘देव द्या, देवपण घ्या’ या पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रमास विद्यार्थी कृती समितीतर्फे सुरुवात करण्यात आली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती व त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधनांमुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण थांबविण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून मागील १० वर्षांपासून सलग उपक्रम राबविण्यात येत आहे. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित केल्या जातात.
गोदावरी नदी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी देव द्या देवपण घ्या या उपक्रमात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन विद्यार्थी कृती समितीने केले असून घरगुती गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती संकलनासाठी विशाल गांगुर्डे, सोनू जाधव, रोहित कळमकर, सागर बाविस्कर, जयंत सोनवणे, तुषार गायकवाड, युवराज कुरकुरे, राहुल मकवाना, भावेश पवार, सिद्धांत आमले, केदार कुरकुरे, संकेत वानखडे, प्रशांत खंडाळकर, संकेत निमसे आदींनी स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडल्याची माहिती समतीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली.