नाशिक : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. परंतु, अशा शिक्षकांची एकत्रित माहितीच शिक्षण विभागाकडे नसल्याने वेतन विभागाने १३ फेब्रुबारी २०१३ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना टीईट उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या असून, शनिवारपासून (दि.१८) टीईटी उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रांची पडतळणी सुरू करण्यात आली असून, सदर काम दि. २२ पर्यंत चालणार आहे.टीईटी अनुत्तीर्ण असूनही कार्यरत असलेल्या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषेच्या शिक्षण विभागाकडे नसल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी अनुदानित शाळांनी संबंधित माहिती तत्काळ शिक्षण उपसंचालक कार्यालयास कळविण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्या होत्या. तसेच जानेवारी महिन्याचे वेतन मिळविण्यासाठी १३ फेब्रुवारीनंतर मान्यता मिळलेल्या शाळांमधील शिक्षकांनी अथवा पूर्वीच्या रिक्त जागेवर नियुक्त केलेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र वेतन विभागालाही सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवारपासून वेतन विभागाने शिक्षकांचे वेतन करताना त्यांच्या टीईटी प्रमाणपत्रांचीही पडताळणी सुरू केली असून, ही प्रक्रिया पुढील चार दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व अनुदान प्राप्त शाळांनी नियोजित वेळेत शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची माहिती सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे नाशिक मनपा क्षेत्रातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील २३ शिक्षकांची समाप्त करण्याच्या सूचना दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजीच संबंधित विद्यालयांना करण्यात आल्या आहेत. परंतु, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये अशाप्रकारे किती शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण असतानाही डिसेंबर २०१९ पर्यंत वेतन घेत होते.याविषयीची माहितीच उपलब्ध नसल्याने संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करून त्यांचे वेतन थांबविण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी वेतन विभागाला १३ फेब्रुवारी २०१३ नंतरच्या सर्वच शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.राज्याची मुदतवाढ केंद्राच्या धोरणाशी विसंगतटीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी राज्य सरकारने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच २०१५ मध्ये केंद्र सरकारने टीईटी उत्तीर्णतेसाठी चार वर्षांची मुदतवाढ दिल्याने राज्याची मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार ३० मार्च २०१९ पर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता १३ फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांच्या टीईटी उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रांची वेतन विभागाकडून पडताळणी सुरू झाली असून २२ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील किती शिक्षकांची सेवा समाप्त होणार याविषयीचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.
‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या माहितीचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:47 PM
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
ठळक मुद्देवेतन विभागाकडून कार्यवाही : अनुत्तीर्णांविषयी शिक्षण विभाग अनभिज्ञ; माहिती कळविण्याची सूचना