नाशिक- कोरोना म्हंटलं की सर्वसामान्य नागरिक भयभीत होतात त्याचबरोबर सर्वत्र सध्या एक भितीबरोबरच निराशेचे वातावरण दिसते. मात्र कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आणि शरीरस्वास्थ्य कायम राखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील माजी सैनिकांनी अनोखा उपक्रम सुरू केला असून आज त्याचा शुभारंभ मालेगावच्या मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आला. देशभक्तीच्या गीतांवर सामूहिक कवायती करण्याच्या माध्यमातून निरोगी आरोग्याचे धडे देण्याच्या उपक्रमात राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे सहभागी झाले होते. त्यांनी ही कवायतीत सहभाग नोंदविला .
कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर मालेगावी सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते त्यानंतर आता करुणा रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी पुन्हा रुग्ण आढळत आहेत त्या पार्श्वभूमीवर माजी सैनिकांच्या पुढाकाराने अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे देशभक्तीच्या गीतांमधून अनोखी ऊर्जाही सहभागी नागरिकांमध्ये निर्माण झाली. कृषी मंत्री दादा भुसे यांनी या कवितांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. कोरोना विरोधातील लढ्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे भुसे यांनी सांगितले माजी सैनिकांच्या माध्यमातून अशा प्रकारचा सामाजिक बांधिलकीतुन असा उपक्रम राबवला जाणं हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
मालेगाव मधील आबालवृद्ध आजच्या या उपक्रमात सहभागी झाले होते कृषी मंत्री दादा भुसे मालेगाव चे उपमहापौर निलेश आहेर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या उपक्रमात सहभागी होऊन देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या.आता मालेगाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये अशा प्रकारची मोहीम राबवून आरोग्याचे धडे दिले जाणार आहेत.