श्री स्वामी समर्थ केंद्रात शहरातील नागरिक व बालयोग साधकांनी एकत्र येत बालसाधकांसाठी सामूहिक ओंकार जप व सहमंत्र सूर्यनमस्कार केले. यावेळी केंद्रप्रमुख बाळासाहेब शेळके यांनी रथसप्तमी व सूर्यनमस्कार यांचे आरोग्य व अध्यात्माच्या दृष्टिकोनातून महत्त्व विशद केले. सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे. ती भगवान सूर्यनारायणाची उपासना आहे तसेच योग अध्यापक राहुल बी. येवला यांनी योगसाधकांना ओंकार व सूर्यनमस्कार या विषयावर व्याख्यान व प्रशिक्षण दिले. आजच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगात जीवन जगताना येणाऱ्या विविध समस्यांना व विविध जीवघेण्या आजारांना तोंड देण्याची शारीरिक व मानसिक क्षमता असणे गरजेचे आहे असे सांगून योगाभ्यासाचे अनेक फायदे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ व बालयोगसाधक उपस्थित होते.
चांदवडला रथसप्तमीनिमित्त सामूहिक सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 5:27 PM