कळवण तालुक्यात किसान क्र ांती मोर्चा व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी संपाची हाक दिली असून, संप काळात कळवण शहर व तालुक्यातून शेतमाल, फळे, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही शहराकडे जाऊ न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला तर संप काळात भाजीपाला व दूध शहराकडे जात असल्याचे आढळून आल्यास वाहनांची तोडफोड करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. पेरणी बंद करून शेतकरी बांधवांनी आता आत्महत्या करणार नाही तर लढणार ही सामूहिक शपथ घेऊन पेरणी बंद करून शेतकरी संपात उतरण्याची घोषणा केली. तालुक्यातील गावागावातून शहराकडे भाजीपाला व दूध शहराकडे जाणार नाही याची काळजी संपकऱ्यांनी घेतली असून, यापुढेही त्यावर लक्ष ठेवण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
कळवणला सामूहिक शपथ
By admin | Published: June 02, 2017 12:49 AM