सांगली : जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची शुक्रवारी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली. तेथे तत्काळ रुजू होण्याचे आदेशही मंत्रालयातून आले आहेत. त्यामुळे उद्या, शनिवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याकडे ते पदभार सोपवणार आहेत.९ आॅगस्ट २०१२ रोजी कुशवाह यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. सुरुवातीलाच त्यांना जिल्ह्यातील दुष्काळाशी सामना करावा लागला होता. जलसंधारणासाठी लघु पाटबंधारे विभागामार्फत त्यांनी बंधारे बांधण्याची मोहीम राबवली. त्याचबरोबर त्यांनी पारदर्शक कारभारावर भर दिला. दाखल्याची आॅनलाईन प्रक्रिया, ई-प्रशासन, शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मोहीमही त्यांनी राबवली. लोकसभा व विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. चांदोलीमध्ये पर्यटन केंद्राची उभारणी व विजयनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी गती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी कुशवाह यांची नाशिकला बदली
By admin | Published: February 06, 2015 11:58 PM