नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणूक कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, काही मतदारसंघांतील मतदान केंद्रांनादेखील त्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली.आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या कामांची, निवडणूक संदर्भात घेण्यात आलेल्या कर्मचाºयांच्या प्रशिक्षणाची व भरारी पथकांमार्फत करण्यात येणाºया कारवार्इंची माहिती माध्यमांना वेळोवेळी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.कळवण, दिंडोरी, देवळा व चांदवड या विधानसभा मतदारसंघांना त्यांनी भेटी दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. शाळांमध्ये असणाºया मतदान केंद्रांवर उपलब्ध किमान सुविधांची पाहणी त्यांनी केली. भेट दिलेल्या मतदारसंघामध्ये स्ट्राँगरु मची व मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. निवडणूक निरीक्षकांमार्फत देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही मांढरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूक कामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:17 AM