नाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशात वाहनांना १ जानेवारीपासून फास्टटॅग लागू केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता २६ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या वाहनाला फास्टटॅग लावून अंमलबजावणी केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या सर्वच वाहनांना फास्टटॅग लावण्यात आला आहे. नवीन वर्षापासून राज्यातही फास्टटॅग बंधनकारक होणार आहे. तथापि त्यास २६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने लागलीच अंमलबजावणी सुरू केली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वाहनाला फास्टटॅग लावून घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या मोहिमेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली असून, प्रशासनातील वाहनांना फास्टटॅग लावले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. फास्टटॅग नसेल तर लागेल दुप्पट टोलn ज्या वाहनाला फास्ट टॅग नाही, परंतु ते वाहन जर या फास्टॅग लेनमधून जात असेल, तर दुप्पट टोल भरावा लागेल, तसेच जे अजून फास्टॅग मिळवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर एक वेगळी लेन असेल, त्या लेनमधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागणार नाही. n प्रवासाला निघण्यापूर्वी, फास्टॅग ज्या खात्याशी जोडलेले असेल, त्या खात्यात टोलसाठी आवश्यक तेवढे पैसे असल्याची खात्री करूनच प्रवासाला निघणे आवश्यक आहे, अन्यथा फास्टॅग लेनमधून गेल्यास, रोख दुप्पट टोल भरावा लागेल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनालाही लागला फास्टटॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:49 PM
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशात वाहनांना १ जानेवारीपासून फास्टटॅग लागू केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता २६ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या वाहनाला फास्टटॅग लावून अंमलबजावणी केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या सर्वच वाहनांना फास्टटॅग लावण्यात आला आहे.
ठळक मुद्देशुभारंभ : प्रशासनाकडून लागलीच प्रतिसाद