दिंडोरी : तालुक्यातील ढकांबे येथील गणपतराव डोळसे पाटील यांच्या स्वस्त धान्य दुकान क्र. ६४ या दुकानाला जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी अचानक भेट दिली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्डधारकांशी संवाद साधला. दोन रुपये किलो गहू व तांदूळ तीन रु पये किलोप्रमाणे सर्व कार्डधारकांना मिळतात तसेच अन्य प्रकारची माहिती दिली़ जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानातील सर्व फलक शासन नियमाप्रमाणे असल्याने स्टॉक रजिस्टर, विक्री रजिस्टरची तपासणी केली व दुकानाच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, मंडल अधिकारी के.एन. शेळके, सरपंच भाऊसाहेब गांगोडे, उपसरपंच मधुकर बोडके, सदस्य संपत आव्हाड, सुरेखा गांगोडे, सुगंधा गोधडे, ढकांबे दक्षता समिती सदस्य भाऊसाहेब बोडके, काशीनाथ धात्रक, प्रभाकर गांगोडे आदि यावेळी उपस्थित होते.(वार्ताहर)
जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By admin | Published: March 14, 2016 10:54 PM