कोरोनाच्या दहा ते अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवापासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असून विविध महाविद्यालयांतील कॉलेज कट्टे गजबजून गेले आहेत. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसह विविध तंत्रशिक्षण व व्यवसाय अभ्यासक्रम विद्याशाखांचे बहुतांश विद्यार्थी प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळांमध्ये रंगल्याचे दिसून आले. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी-बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले असून वरिष्ठ महाविद्यालयांना पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील एचपीटी, आरवायके, बीवायके, केटीएचएम, केव्हीएन नाईक, नाशिकरोड येथील बिटको व सिडको येथील महाविद्यालये विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या वर्दळीने फुलून गेली आहेत. त्याचप्रमाणे जवळपास दहा ते अकरा महिन्यांपासून ओस पडलेले कॉलेज कट्टेही पुन्हा गजबजले आहेत. यात एचपीटी महाविद्यालय परिसरातील स्मार्ट कट्टा, वायडी कट्टा, व्हाइट हाऊस यासह बीवायकेच्या उद्यान आवारातील कट्टेही विद्यार्थ्यांनी गजबजून गेले आहेत. केटीएचएम महाविद्यालयासमोरील मैदानासह मराठा हायस्कूलचा परिसर व कॅन्टीनचे आवारही विद्यार्थ्यांनी फूलून गेले आहे.
इन्फो-१
कोरोनावर गप्पाटप्पा
महाविद्यालयीन कट्ट्यांवर कोरोना काळातील घटनांवर गप्पा रंगल्या. कोरोनामुळे तब्बल दहा ते बारा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रदीर्घ काळ बंद राहिलेली महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
इन्फो-२
अभ्यासासाठी शोधला एकांत
शहरातील महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाली असली तरी कनिष्ठ महाविद्यालये ४ जानेवारीपासूनच उघडली आहेत. त्यामुळे बारावीच्या वि्द्यार्थांचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. विज्ञान शाखेचे विद्यार्थी सकाळ सत्रातील तासिका संपल्यानंतर प्रात्यक्षिकांसाठी थांबून राहतात. मधल्या वेळेत यातील काही विद्यार्थी महाविद्यालय परिसरात एकांतात बसत असल्याचे दिसून आले.
कोट-
कॉलेज सुरू झाल्यामुळे काहीशा खुल्या वातावरणाचा अनुभव मिळतो आहे. कोरोना काळात मित्रांसोबत भेट होत नव्हती. फोनवरून होणारा संवादही अभ्यासासाठीच होता. आता प्रत्यक्ष भेटल्यानंतर वेगवेगळ्या विषयावर दिलखुलासपणे बोलता येते.
- साहिल पवार, विद्यार्थी
===Photopath===
160221\16nsk_41_16022021_13.jpg
===Caption===
महाविद्यालय आवारातील कट्टयांवर गप्पांमध्ये दंग झालेले विद्यार्थी