महाविद्यालयाने जमविला केरळसाठी मदत निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:45 PM2018-09-28T17:45:27+5:302018-09-28T17:45:44+5:30
चांदवडं - येथील मविप्र चे कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रासेयो विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने केरळ फ्लड रिलीफ फंड उभारला जात असून त्यासाठी आज वडनेर भैरव गावातून निधी जमविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यर्ा्थ्यांनी रॅली चे आयोजन केले होते.
चांदवडं - येथील मविप्र चे कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रासेयो विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने केरळ फ्लड रिलीफ फंड उभारला जात असून त्यासाठी आज वडनेर भैरव गावातून निधी जमविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यर्ा्थ्यांनी रॅली चे आयोजन केले होते. रॅली चे उदघाटन महाविद्यालयाच्या प्रांगणात झाले. यावेळी दिलीपराव धारराव, हिरामण शिंदे ्नसहाय्यक पोलीस निरीक्षक सचिनजी साळुंखे साहेब प्रमुख अतिथी होते. प्रास्ताविकात प्राचार्य ए. एल. भगत यांनी केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींहुन अधिक नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांची अजूनही उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत. आपणही याकामी मागे राहता कामा नये.यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने राष्ट्रीय आपत्ती च्या काळात संघटित होऊन एकमेकांची मदत करायला हवी असे मत दिलीप धारराव यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय ऐक्य दाखवण्याची हीच वेळ असून अधिकाधिक गावकरी बांधवांनी केरळ साठी मदत करावी तर पोलीस स्टेशन च्या सर्व कर्मचाऱ्यांनी देखील आपला एक दिवसाचा पगार केरळ मदत निधीत दिल्याचे साळुंखे यांनी सांगितले. यानंतर वडनेर भैरव गावात सोसायटी गेट पासून रॅली ला सुरु वात झाली. एनएस.एस.च्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी गावातील प्रत्येक गल्ली व दारोदार फिरून दानपेटी फिरवत गावातून केरळ साठी मदत निधी जमा केला. रु . 9,620/- इतका निधी तसेच काही कपडे दान स्वरु पात जमा झाले असून ते लवकरच पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू फंड च्या द्वारे केरळ आपत्ती निवारण साठी पाठविण्यात येणार आहेत. आयोजन महाविद्यालयाचा विभाग,वडनेरभैरव पोलीस स्टेशन, व्यापारी असोसिएशन आणि एकता ग्रुप चे विशेष सहकार्य लाभले होते . कॉलेजच्या विद्यर्ा्थ्यांनी सामाजिक भान जपत हा चांगला उपक्र म राबविला याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.