नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या असून, नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकामज सुरू करण्यासही विद्यापीठाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु, महाविद्यालयांमधील प्रत्यक्ष शैक्षणिक कामकाज बंदच ठेवण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये ३० जूनपर्यंत कोणत्याही तासिका अथवा शैक्षणिक कामकाज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सध्याच्या स्थितीचा विचार करून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भातील संभाव्य नियोजन शिक्षण विभागाला दिले आहे. त्यानुसार ३० जूनपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याबाबत विद्यापीठाकडून कळविले आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त सर्व परिसंस्था बंद राहणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्येही नियमित तासिका सुरू होण्यासाठी जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु, त्यासाठी विद्यापीठावाही शासन निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याने महाविद्यालये नियमित सुरू होण्याविषयी अद्यापही साशंकता आहे. या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी मुख्यालय न सोडता अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजाकरिता आदेशानुसार कार्यालयामध्ये उपस्थित रहावे. इतर सर्व सेवकांनी घरी राहून वर्क फ्रॉम होम कार्यालयीन कामकाज पहावे. यासंदर्भात शासनाचे अथवा सक्षम प्राधिकरणाचे काही वेगळे आदेश प्राप्त झाल्यास त्यासंदर्भात स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील प्रशासकीय कार्यालये, शैक्षणिक विभागातील कार्यालये तसेच नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकाजाबाबतही विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
महाविद्यालयेही 30 जूनपर्यंत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 8:18 PM
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या असून, नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकामज सुरू करण्यासही विद्यापीठाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु, महाविद्यालयांमधील प्रत्यक्ष शैक्षणिक कामकाज बंदच ठेवण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहे.
ठळक मुद्दे30 जूनपर्यंत कॉलेज कट्ट्यांवर शुकशुकाटच विद्यापीठाकडून तासिका सुरू न करण्याच्या सुचना