नाशिक : वसंतोत्सवाच्या आगमनाचे स्वागत करणारा रंगपंचमी सण सोमवारी (दि.२५) साजरा करण्यासाठी आबालवृद्ध रंग आणि रहाडींसह सज्ज झाले आहेत. बाजारपेठेत रविवारच्या सुटीची पर्वणी साधून कोरडे, ओले रंग, विविध आकारांतील वैविध्यपूर्ण पिचकाऱ्या आदींच्या खरेदीची गर्दी पहायला मिळाली.पेशवेकाळापासून नाशिककरांनी जोपासलेली रहाड संस्कृती यंदाही साजरी होणार असून, त्याचेही नियोजन व तयारी रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पहायला मिळाली. पारंपरिक रहाडींबरोबरच शहरात सर्वत्र वैयक्तिक, सामूहिक स्वरूपात रंगपंचमी खेळली जाणार असून, त्यासाठी कोरडे, रासायनिक रंग, पिचकाऱ्या, पाणी आदींची तयारी करण्यात आली आहे.रंगपंचमीसाठी लागणारे रंग, लहान मुलांसाठी विविध आकारांच्या पिचकाºया आदींच्या खरेदीसाठी दुकानांवर ग्राहकांची लगबग रविवारी दिसत होती. रंगपंचमी सण शहरात उत्साहात साजरा होणार आहे.रहाडीतील रंगांची परंपरापेशवेकाळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व पंचवटीच्या विविध भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला खूप मोठा इतिहास असून, ती वर्षानुवर्षे तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात शनि चौक, तिवंधा चौक, जुनी तांबट आळी अशा तीन रहाडी उघडण्यात आल्या आहेत. जुनी तांबट लेन रहाडोत्सव समितीच्या वतीने रहाडोत्सवात यंदा महिलांसाठी दोन तासांचा विशेष कालावधी राखून ठेवण्यात आला आहे.
आज उधळणार रंग ; आबालवृद्ध सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:31 AM