नाशिक : अडथळ्यांची शर्यत, रस्सीखेच, धावण्याची स्पर्धाच्या माध्यमातून इस्पॅलियर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगल्याचे दिसून आले. मानवी मनोऱ्यांच्या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले. इस्पॅलियर स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाची सुरुवात विद्यार्थ्यांनी केलेल्या सूत्रबद्ध संचलनाने झाली. विद्यार्थी प्रतिनिधी नचिकेत घुले व विद्यार्थिनी प्रतिनिधी कल्याणी कर्पे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू हे संघ संचलन करत होते. क्रीडा ज्योतीचा मान राष्ट्रीय पातळीवरील खेळांडून देण्यात आला. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळांची आवड जोपासण्यासाठी तसेच त्यांच्यातील अंगभूत कौशल्यांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुण यानिमित्ताने सर्वांसमोर येत असतात. शालेय स्तरावरील खेळांतूनच भविष्याच राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडत असल्याने विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, क्रीडा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी अधिप गुप्ता, अलिअसगर अबुजीवाला, ताहा अबुजीवाला यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. क्रीडा महोत्सवाची सांगता जल्लोषात झाली.
शालेय क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांमध्ये रंगल्या चुरशीच्या स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 1:10 PM
अडथळ्यांची शर्यत, रस्सीखेच, धावण्याची स्पर्धाच्या माध्यमातून इस्पॅलियर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगल्याचे दिसून आले. मानवी मनोऱ्यांच्या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले.
ठळक मुद्देइस्पॅलियर स्कूलमध्ये रंगला क्रीडा महोत्सवअडथळ्यांची शर्यत, रस्सीखेच, धावण्याची स्पर्धेत रंगली चुरस