नाशिक : दिवंगत प्रमिलाबाई रामकृष्ण मिरजकर ट्रस्टतर्फे आयोजित रामकृष्ण अमृत मिरजकर व प्रमिलाबाई रामकृष्ण मिरजकर यांच्या स्मृती समारोह व कृतज्ञता गौरव सोहळ्याचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या सोहळ्याच्या द्वितीय पुष्पात प्रख्यात गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाची मैफल संपन्न झाली.शंकराचार्य संकुल येथे शनिवारी (दि. २८) हा कार्यक्र म झाला. पंडित शौनक अभिषेकी यांची गायन मैफल मारवा रागाने सजली. सायंकाळच्या वेळी गायिल्या जाणाऱ्या या रागाने रसिक तृप्त केले. ‘मारवा’तील ताना, हरकती, बारकाव्यांनी उपस्थितांना पं. अभिषेकी यांच्या गायनातील विलक्षण ताकदीचा प्रत्यय दिला.मैफलीत गायनास प्रारंभ करण्यापूर्वी पं. अभिषेकी म्हणाले, ‘वडील पंडित जितेंद्र अभिषेकी यांची आठवण म्हणून त्यांच्या काही रचना गाणार आहोत. मारवा हा सायंकाळी गायिला जाणारा आपला आवडता राग असून, त्यातील काही बंदिशी नाशिककरांसमोर पेश करीत आहोत.’ त्यानंतर त्यांच्या शास्त्रीय गायनात नाशिककर तल्लीन झाले. त्यांना अबीर अभिषेकी (स्वरसाथ व तानपुरा), नितीन वारे (तबला), सागर कुलकर्णी (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), सत्यजित बेडेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार माधवराव पाटील, पं. मकरंद हिंगणे, प्राचार्य रा. शां. गोºहे, प्रा. संजय मिरजकर यांच्यासह रसिक उपस्थित होते.
पंडित अभिषेकी यांच्या गायनाची रंगली मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:46 AM