नाशिक : ‘दमा दम मस्त कलंदर’पासून ‘तेरी दिवानी’ अशी एकापेक्षा एक उडत्या चालीच्या अमृताच्या गीतांना ‘सूर निरागस हो’ या रागदारीशी निगडित गाण्यापासून ‘डीपाडी डिपांग’ या अवखळ गीतांची साथ देत चैतन्य कुलकर्णी यांनी भाभानगरच्या ‘भाऊबीज पहाट’ कार्यक्रमात रंगत आणली.मुंबई नाका मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘भाऊबीज पहाट’ या कार्यक्रमात झी सारेगमपा स्पर्धेचे विजेते अमृता नातू आणि चैतन्य कुलकर्णी यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी चैतन्यने जाने क्यू लोग प्यार करते है, पहला नशा पहला खुमार, एक लडकीको देखा तो ऐसा लगा, ना तुम जानो ना हम, कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना अशी एकाहून एक सरस हिंदी आणि मराठी गीतेदेखील सादर केली. तर अमृताने दिल तो पागल है, इतनीसी हंसी इतनीसी खुशी, आली माझ्या घरी ही दिवाळी, ओवाळीते लाडक्या भाऊराया अशी हिंदी, मराठी गीते तसेच दीपोत्सव विशेष गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. आभार प्रथमेश गिते यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वसंत गिते यांच्या मार्गदर्शनाखाली युवक मित्रमंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष विनोद गाडे, विकास शेवाळे, वाल्मीक मोटकरी, वंदना शेवाळे, संजय कांबळे, विजय काठे यांनी सहकार्य केले.कृष्णा यांच्या ढोलकीने रंगतनटरंग चित्रपटात वाजवलेल्या ढोलकीपासून प्रख्यात झालेल्या कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवादनाला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. विशेषत्वे लावणीच्या प्रारंभी वाजवल्या जाणाऱ्या ढोलकीच्या नादाला तर प्रेक्षकांनी वन्समोअरची दाद दिली.
चैतन्य-अमृताच्या स्वरसाजने भाऊबीजची रंगली पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:28 AM