नाशिक : निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्यावत करण्याच्या सुचना देतानाच नवीन मतदार यादीत सर्वच मतदारांचे रंगीत छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या मतदारांचे यादीत छायाचित्र नाही व ज्यांचे छायाचित्रे कृष्णधवल आहेत अशा सर्वांचे रंगीत छायाचित्रे गोळा करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी करण्याबरोबरच बोगस मतदानाला आळा बसून मतदाराची स्पष्ट ओळख पटावी असा यामागे हेतू आहे. यापुर्वी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदाराकडून छायाचित्रे गोळा केली होती, त्यावेळी बहुतांशी मतदारांनी आपल्याकडील रंगीत छायाचित्रे दिली होती. परंतु आयोगाने अशा मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत कृष्णधवल प्रसिद्ध केले होते. तर साधारणत: १९९७ मध्ये मतदारांना देण्यात आलेले तत्कालीन शेषण कार्डावर रंगीत छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आले होते. वर्षानुवर्षे मतदारांचे कृष्णधवल छायाचित्रे असलेली मतदार यादी निवडणुकीसाठी वापरली जात असताना आता मतदार यादी अद्यावत करण्यासाठी सर्वच मतदारांचे रंगीत छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी यापुर्वी ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्रे निवडणूक आयोगाने काढले होते किंवा मतदाराने मतदार नोंदणी करताना स्वत:हून आणून दिली होती. अशा सर्वांचे छायाचित्रे रंगीत स्वरूपात मतदार यादीत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघातील ८२६४३१ मतदारांचे रंगीत छायाचित्रे सध्या निवडणूक शाखेच्या ताब्यात असून, ५१५१८७ मतदारांचे छायाचित्रे यादीत देण्यात आली आहेत. सध्या १११५६० मतदारांचे छायाचित्रे कृष्णधवल आहेत. अशा मतदारांचा घरोघरी जावून बीएलओ मार्फत शोध घेवून त्यांच्याकडून रंगीत छायाचित्रे गोळा केली जाणार आहेत. ज्या मतदारांकडे छायाचित्र नसेल त्यांचे भ्रमणध्वनीत बीएलओ छायाचित्रे काढून ते निवडणूक शाखेला सोपविणार आहे. तथापि, जे मतदार नाव, पत्त्यावर सापडणार नाहीत त्यांचे नावे मतदार यादीतून बाद करण्यात येणार आहे. असा मतदार पत्त्यावर मिळून येत नसल्याबाबत बीएलओ पंचनामा करून नाव कमी करण्याबाबत प्रस्ताव सादर करतील. एप्रिल महिन्यात सर्व मतदारांचे छायाचित्रे गोळा करण्याचे कामे सोपविण्यात आली असून, ज्या मतदारांचे रंगीत छायाचित्रे नाहीत त्यांचे नावे मतदार यादीत समाविष्ट असणार नाही, थोडक्यात त्यांना मतदानाची संधी मिळणार नाही.
यादीत येणार मतदारांचे रंगीत छायाचित्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 3:42 PM
नाशिक : निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्यावत करण्याच्या सुचना देतानाच नवीन मतदार यादीत सर्वच मतदारांचे रंगीत छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या मतदारांचे यादीत छायाचित्र नाही व ज्यांचे छायाचित्रे कृष्णधवल आहेत अशा सर्वांचे रंगीत छायाचित्रे गोळा करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी ...
ठळक मुद्देमतदार यादी : एक लाख फोटो गोळा करणारबोगस मतदानाला आळा बसून मतदाराची स्पष्ट ओळख पटावी