उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका चौफुलीपर्यंत काळवंडलेल्या रस्ता दुभाजक व लोखंडीरॅलिंगला रंगरंगोटी करण्यात येत असल्याने नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. नाशिक-पुणेरोडवरील द्वारका चौफुली ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतचे रस्ता दुभाजक व त्यामधील लोखंडी रेलिंगला रंगरंगोटी करण्यात आली नव्हती. वाहनांच्या धुरामुळे सीमेंटचे दुभाजक काळवंडून गेल्याने रात्रीच्या वेळी अंधारात दिसत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत होते. मनपाकडून दत्तमंदिर सिग्नल ते द्वारका पर्यंतच्या रस्ता दुभाजक व त्यामधील लोखंडी रॅलिंगला काळ्या-पिवळ्या रंगाचे पट्टे मारण्यात येत असल्याने त्याला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर मनपाकडून दुभाजकामध्ये व दुभाजकालगत साचलेली माती, केरकचरा उचलून स्वच्छ करण्यात आला आहे. यामुळे धूळ व माती उडण्याचे प्रमाण कमी झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दुभाजकातील रॅलिंगला रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:39 AM