कळवण : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून कळवण तालुक्यातील मेहदर येथील लाभार्थी श्रीमती पद्मा देवीदास आंबेकर यांनी आपल्या शौचालयाची रंगरंगोटी करून खऱ्या अर्थाने शौचालय दिन साजरा केला आहे . स्वच्छतेच्या अनुषंगाने यावर्षीही जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा-अंगणवाडीच्या शौचालयासंदर्भात दि. १७ ते २७ नोव्हेंबर कालावधीत विशेष अभियान राबविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती लीना बनसोड यांनी आदेशित केले आहे. कळवण तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतीमध्ये या कालावधीत स्वच्छतेच्या अनुषंगाने कार्यक्रम होत आहेत. मेहदर येथील महिला लाभार्थी पद्मा आंबेकर यांनी २०१७ साली शौचालयाचे बांधकाम केले. शौचालय हेच खरे इज्जत घर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी जागतिक शौचालयदिनी दिली. मेहदर ग्रामपंचायत अंतर्गत १६५ कुटुंबे असून, मेहदर गाव हागणदारीमुक्त आहे. गावाची वाटचाल आदर्श गावाकडे होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामसेवक वैशाली देवरे व कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांनी दिली.----------------सॅनिटरी नॅपकिन मशीनग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्यसॅनिटरी नॅपकिनह्णला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र त्याची उपलब्धता आणि किमतींमुळे ते आदिवासी भागातील महिलांच्या आवाक्याबाहेर आहेत. नॅपकिन वापरून शकणाऱ्या ८० टक्के महिलांमध्ये न परवडणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊनच मेहदर ग्रामपंचायतीने २ वर्षापूर्वी सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वापरलेल्या पॅडचे व्यवस्थापन करणेही गरजेचे असल्याने त्याचेही व्यवस्थापन केले. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामसेविका वैशाली देवरे व सरपंच संगीता बागुल यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे तसेच यासोबत एक शोषखड्डा असलेल्या लाभार्थींनी दोन खड्ड्यात शौचालयाचे रूपांतर केल्याने त्यांचे सन्मान भेट व प्रमाणपत्र देत गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.-----------------ग्रामसेवक श्रीमती देवरे यांनी मला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केले. शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केल्यानंतर त्याचे महत्त्व कळाले. शौचालयाचा नियमित वापर केल्याने आरोग्याच्या समस्या भेडसावत नाही. मी व माझे कुटुंब नियमित शौचालयाचा वापर करतो.- पद्मा आंबेकर, मेहदर
महिला लाभार्थीने केली शौचालयाला रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:35 PM