शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

...अब आए अपने-अपने ‘औकात’ पें!

By admin | Published: January 29, 2017 10:47 PM

युतीत फारकत : सोशल मीडियावर ‘औकात’ शेरो-शायरींची धमाल

नाशिक : सेना-भाजपा युतीत फारकतीची घोषणा सेनेकडून झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ दाखवून देऊ, अशा शब्दात प्रहार केले तर ‘आमची औकात लवकरच कळेल’ असे प्रत्युत्तर शिवसेनेने भाजपाला दिले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आता दोन्ही पक्ष आपल्या ‘औकाती’वर आले असताना, त्यात सोशल मीडिया मागे कसा राहील. दोन दिवसांपासून व्हॉट्स अ‍ॅप- फेसबुकवर ‘औकात’ शायरींनी धमाल चालविली आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडण्यावरून सेना-भाजपात शाब्दीक राडा सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर आरोप करत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी भाजपाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ काढत चुचकारले. भाजपाने प्रहार केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘त्यांना आमची औकात दाखवून देऊ’ असे प्रतिआव्हान दिले आहे. एकमेकांची ‘औकात’ काढण्याचा हा खेळ सुरू झाल्यानंतर युतीला मानणाऱ्या मतदारांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, या ‘औकात’ शब्दाने सोशल मीडियावर शेरो-शायरींची बरसात सुरू झाली आणि व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुकवर दिवसभर ठाण मांडून बसणाऱ्यांना चघळायला आयताच एक विषय चालून आला.   ‘बिगड रहा हो वक्त तो, न कोई हालात पूछता हैं, टकरा जाता हैं कोई अनजाने में, तो सबसे पहले औकात पूछता हैं’, या शायरीतून शिवसेनेची दोलायमान स्थिती दर्शविली जात आहे. त्यावर, भाजपाला मानणाऱ्यांकडून प्रत्युत्तर देताना म्हटले आहे, ‘दिखा दी हैं औकात, जिन्हे हम अपना मानते थे, वोही निकले बेवफा, जिन्हे सबसे करीब मानते थे’ एक सेना समर्थक म्हणतो, ‘बात तो औकात की होती हैं, जिंदगी में अक्सर, कोई बता जाता हैं, कोई दिखा जाता हैं’ याशिवाय, ‘बुरे वक्त के साथ जो मैने अपनी मुलाकात देखली, किसी की सच्चाई और किसी की औकात देखली’, ‘बदल गयी हैं जिंदगी, किसी के दिन और किसी की रात, अब वो लहजा कहॉ हैं, उसके अल्फाजों में देखो आज किसी की औकात बदल गयी हैं’, ‘गरीबों की औकात ना पूछो तो अच्छा हैं, इनकी कई जात ना पूछो तो अच्छा हैं, चेहरे कई बेनकाब हो जायेंगे, ऐसी कोई बात ना पूछों तो अच्छा हैं’... यांसारख्या शेरो-शायरी व्हॉट्स ग्रुपवर फॉरवर्ड होत आहेत.