लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे.सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.यावर्षी धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तीन मिहन्यापेक्षा जास्त दिवस ओव्हरफ्लो आवर्तन सोडण्यात आले होते.या आवर्तनातून तालुक्यातील सर्व लहान मोठे बंधारे भरण्यात आले होते .त्यामुळे या वर्षी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची मोठया प्रमाणात लागवड केली आहे. मागील मिहन्यात रब्बीसाठी आवर्तन दिल्याने शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, व भाजीपाला पिकांना या आवर्तनाचा लाभ झाला होता.सध्या कडक उन्हाचे दिवस सुरु झाल्याने पिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याचा उपसा लवकर होत असल्याने पिकांना पाणी टंचाईचा फटका बसला असल्याने कालव्यास आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकर्यांनी केली होती. त्याचप्रमाणे येवला तालुक्यात मोठया प्रमाणात द्राक्ष व डाळिंब बागा असून त्यांनाही पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरु वात झाली होती.त्यामुळे शेतकरी वर्गातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.या आवर्तनाने तालुक्यातील अडोतीस गाव पाणी पुरवठा योजना येवला तसेच मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव व मनमाड रेल्वेला पाणी पुरवठा करणारा तलाव भरला जाणार असल्याने पाणी टंचाईची ओरड कमी होणार आहे.
पालखेडच्या आवर्तनाने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:55 PM
पाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे.सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.
ठळक मुद्देकालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.