येवला : देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या भिंतीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. असेच काम सुरू राहीले तर काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करत येत्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करा, येत्या पावसाळ्यातच देवसाने प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत आणा, अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भुजबळ फार्म येथील आयोजित बैठकीत दिल्या.पुणेगाव ते दरसवाडी हा ६३ कि.मी. चा पाण्याचा प्रवास चाचणी वेळेस अतिशय अडचणीतून झाला. पाणी अनेक ठिकाणी लिकेज आहे. काँक्र ीटीकरण प्रस्तावित आहे, पण त्या अगोदर तात्काळ पाणी गळती होणार नाही यावर उपाययोजना करा. १ ते २५ कि.मी. मधील रु ंदीकरणचे राहिलेले काम लवकर पूर्ण करा. तसेच वणी येथील बोगदा रु ंदीकरण काम लवकर सुरू करून पुणेगाव ते दरसवाडी या पावसाळ्यातच पूर्णत: २२० क्यूसेसने कसा प्रवाहित होईल यावर उपाययोजना करा असे आदेश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरसवाडी ते बाळापूर हा ४० कि.मी. पाणी प्रवास देखील खूप अडचणीत झालेला आहे. १५४ क्यूसेस कॅनॉल मध्ये फक्त ५० क्यूसेस पाणी प्रवाहित होते. हा कॅनॉल पूर्णपणे १५४ क्यूसेस ने प्रवाहित झाला पाहिजे. केदराई ते दरसवाडी ६ किमी कालवा दुरु स्त केल्यास तसेच काळलवन ,जोपूळ नदीचे पाणी दरसवाडी धरणात वळवल्यास धरण लवकर भरण्यास मदत होईल व पाणी लवकर सोडता येईल असे आंदोलक मोहन शेलार यांनी निदर्शनास आणून देताच यावर कार्यवाही करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी केल्या.
येत्या पावसाळ्यातच पाणी डोंगरगावपर्यंत आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 5:56 PM
छगन भुजबळ : पाटबंधारे विभागाच्या बैठकीत आढावा
ठळक मुद्दे पुणेगाव ते दरसवाडी या पावसाळ्यातच पूर्णत: २२० क्यूसेसने कसा प्रवाहित होईल यावर उपाययोजना करा असे आदेश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले