शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

सेनापती तात्या टोपे स्मारकाची जागा बदलण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:14 AM

येवल्याचे भूमिपुत्र आणि १८५७ च्या उठावातील सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे, यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांची व पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे सिंहगड विश्रामगृहात सोमवारी पार पडली. त्यात जागा बदलण्याचे संकेत मिळाले असून, समितीने चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले आहे.

येवला : येवल्याचे भूमिपुत्र आणि १८५७ च्या उठावातील सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे, यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांची व पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे सिंहगड विश्रामगृहात सोमवारी पार पडली. त्यात जागा बदलण्याचे संकेत मिळाले असून, समितीने चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. येवल्यात सेनापती तात्या टोपे यांचे साडेदहा कोटी रुपये खर्चाचे स्मारक नियोजित आहे. पाणीपुरवठा साठवण तलावाजवळील जागेवर हे स्मारक व्हावे, असा ठराव पालिकेने केला आहे; परंतु पालिकेने प्रस्तावित केलेली ही जागा गैरसोयीची व अडगळीची असल्याने हे स्मारक नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील अंगणगाव शिवारात तीन हेक्टर ३५ आर. या शासनाच्या जलसंपदा विभागाच्या जागी व्हावे, असा आग्रह समितीने नाशिक येथील बैठकीत धरला. समिती सदस्यांनी चर्चेत भाग घेताना जागा बदलाचा आग्रह धरला आणि खासदार चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बैठकीसाठी डॉ. किशोर पहिलवान, धनंजय कुलकर्णी, सुभाष पहिलवान पाटोळे, रमेश भावसार, श्रावण जावळे, युवराज पाटोळे, सुनील सस्कर, संजय सोमसे, राहुल भावसार उपस्थित होते.समितीचा विश्वासपालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि जलसंपदा प्रशासन स्मारकाच्या उचित जागेसाठी कृतीतून अनुकूलता दाखवत असताना येवला पालिकेचे लोकप्रतिनिधी उदासीनता का दाखवत आहेत, असा सवाल या बैठकीत उपस्थित झाला. तात्या टोपे यांच्या स्मारकासाठी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जागा उपलब्ध होण्यासाठी मार्ग मोकळा असल्याचा विश्वास निर्माण झाला.स्मारक नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत व्हावे यासाठी समितीने सुचवलेल्या जागीच होण्यासाठी मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक यांनी तयारी दाखवत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेने सहमती दर्शविली. व या संबंधीचा प्रस्ताव कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्याकडे नकाशासह तत्काळ पाठवल्याची माहिती कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट यांनी खासदार चव्हाण व समिती सदस्यांना दिली.

टॅग्स :Nashikनाशिक