नाशिक : देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि़२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तीन पथकांनी हवेत तीन फैरी झाडून शहिदांना अभिवादन केले़ पोलीस दलाच्या परंपरेनुसार २१ आॅक्टोबर हा दिवस शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो़
शहर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना २०१७-१८ या कालावधीत शहीद झालेल्या देशभरातील ४१४ पोलीस अधिकारी - कर्मचाºयांना मानवंदना देण्यात आली़ या शहिदांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी कदम, गावडे व मडावी या तीन जवानांचा समावेश आहे़ सहायक पोलीस आयुक्त दीपक गि-हे व अजय देवरे यांनी शहीद पोलिसांच्या नावाचे वाचन केले़
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक अश्वती दोरजे, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकाºयांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले़ तत्पूर्वी पोलीस कर्मचाºयांनी शोकसंचलन केले़
यावेळी शहरातील मान्यवर तसेच पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह, पोलीस अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते़
महाराष्ट्रातील तीन पोलीस कर्मचारी शहीद
* शहीद पोलीस हवालदार सुरेश दयाराम गावडे - गडचिरोली येथे कार्यरत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात झुंज देतांना गंभीर जखमी झालेले सुरेश गावडे हे शहीद झाले़ * शहीद पोलीस हवालदार सुनील दत्तात्रय कदम - ११ मे २०१८ रोजी ठाण्यातील एका पॉर्इंटवर उभे असताना तीन संशयित पळू लागल्याने त्यांचा पाठलाग करून मुकाबला करताना कदम शहीद झाले़ * शहीद पोलीस नाईक सतीश शरदराव मडावी - अमरावती येथे कार्यरत असलेले सतीश मडावी यांनी अवैध दारुभट्टीवर छापा टाकला़ यावेळी आरोपींनी कुºहाडीने केलेल्या हल्ल्यात मडावी शहीद झाले़